Rang Jivnache
रंग जीवनाचे ... आपल्या दैनंदिन जीवनात रंगांचं खूप जास्त महत्त्व असतं . आपल्या कळत नकळत आपलं रंगांशी खूप जवळच नातं जोडलं जातं . कपडे, ज्वेलरी, गाड्या, घरं, घरांची सजावट, वाढदिवसांच्या थीम्स आणि बरेच काही! अगदी जेवणसुद्धा पहिले डोळ्यांनी जेवलं जातं असं म्हणतात. निसर्गात तर रंगांची अगदी उधळण झालेली असते. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये निसर्गात दडलेल्या अनेक रंगछटा आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या रंगांचं दर्शन आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या परिस्थिती आणि प्रसंगी माणसंही आपल्याला करून देत असतात. जन्म आणि मृत्यू या दोघांमधला प्रवास म्हणजे "जीवन". जीवनात आपलं स्वागत अश्या दोन व्यक्तींकडून होतं ज्या त्यांच्या आयुष्यातल्या अनेक चढ-उतार, उन्हाळा-पावसाळ्यात शेवटपर्यंत एकमेकांना साथ देतात. आपण अनोळखी माणसांसोबत सहज बोलतसुद्धा नाही पण आई-वडील नऊ महिने न पाहिलेल्या व्यक्तीवर प्रेम करतात आणि शेवटपर्यंत करत राहतात. त्यांचं प्रेम हे निळ्याशार अथांग समुद्रासारखेच असते….कधीही न संपणारे,नाही का? लहानपणी आई, आजीकडून काळ्या रंगाचे काजळ आणि तीट लावून वाईट शक्तीपासून आपलं रक्षण केलं...